अवश्य भेट द्या भारतातील एकमेव ‘मड व्होल्कॅनो’ला

volcano
सुट्टीसाठी अंदमानला जाण्याचा बेत करीत असाल, तर तेथील निरनिरळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्याबरोबरच आणखी एका ठिकाणी आवर्जून भेट देण्याचा विचार करता येऊ शकेल. हे ठिकाण पोर्ट ब्लेअर पासून सुमारे शंभर किलोमीटरच्या अंतरावर असून, या ठिकाणी भारतातील एकमेव, सक्रीय असणारा ‘मड व्होल्कॅनो’ आहे. चिखल किंवा ओली माती बाहेर टाकल्या जाणाऱ्या या व्होल्कॅनोला स्थानिक लोक ‘जाल्की’ नावाने संबोधतात.
volcano1
हा ‘मड व्होल्कॅनो’ पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, हा पाहण्यासाठी दर वर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. पण हा व्होल्कॅनो पाहण्यास जायचे असेल, तर त्यासाठी भरपूर प्रवास करून या ठिकाणी पोहोचावे लागते. ‘ जारवान ट्रायबल रिझर्व्ह’ मधून प्रवास करून, त्यानंतर बारातांग जेटी येथे समुद्रमार्गे पोहोचता येते. त्यानंतर वीस मिनिटे बसचा किंवा गाडीचा प्रवास पार पाडल्यानंतर या ठिकाणी पोहोचता येते. हा प्रवास पार पाडण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च होतो.
volcano2
हा मड व्होल्कॅनो संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियांनी तयार झालेला असून, जमिनीखाली खोलवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक वायूंच्या दबावामुळे हा व्होल्कॅनो सक्रीय होत असतो. हे वायू जमिनीखाली दबलेल्या जैविक पदार्थांच्या सडण्याच्या प्रक्रियेमुळे तयार होत असतात. या वायूंच्या दबावामुळे त्या ठिकाणची माती ही वर ढकलली जाउन त्या ठिकाणी मोठी विवरे तयार होतात. जमिनीच्या वर आलेली माती तिथेच सुकून कडक होते.
volcano3
चिखलाचे किंव मातीचे उद्रेक या ठिकाणी अधून मधून पाहायला मिळतात. २००४ साली हिंद महासागरामध्ये आलेल्या भुकंपानंतर हा व्होल्कॅनो मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर उद्रेक येथे अजून झालेले नाहीत.

Leave a Comment