तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनून कमवू शकता महिना लाखो रुपये

social-media
आजच्या काळात अंदाजे दिवसातील एक तास एक व्यक्ती सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. या तासात तुम्ही सोशल मिडियावरून कमाई करू शकता. सगळे ब्रँड्स आजकाल आपल्या प्रोडक्टचे सोशल मिडियावर प्रमोशन करत असतात. कारण यूथ सोबत सोशल मिडियावर कनेक्ट करणे सोपे आहे. आपल्या प्रोडक्ट्सच्या प्रमोशनसाठी कंपनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हायर करते. तुम्हीही त्यात इन्फ्लूएंसर बनून लाखों रुपयांची कमाई करू शकता.

तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर जर अॅक्टिव असाल आणि तुमचे काही फोलोवर्स असतील तर सोप्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनू शकता. तुम्ही यासाठी कंपनी किंवा ब्रँड्ससोबत कनेक्ट करुन, सोशल मीडियावर त्यांचे प्रोडक्ट एंडोर्स करावे लागतील. याच प्रकारे ब्रांड्स एंडोर्स करून दिल्लीत राहणारे लोकेन्द्र सिंह राणावत महिना लाख ते दिड लाख कमाई करत आहेत. इंस्टाग्रामवर Mr. Ranawat नावाने त्यांनी पाच वर्षापासून पोस्ट टाकणे सुरू केले होते आणि एक लाखांपेक्षा जास्त त्यांचे फलोअर्स आहेत. www.indiangentlemen.com नावाचा ब्लॉगही ते पब्लिश करतात ते ज्यात ब्रँड्ससाठी कंटेट लिहीतात.

या डिजीटल इंडियामध्ये जवळ-जवळ सर्वच कंपन्या सोशल मिडियावर आपल्या ब्रँड्सचे प्रमोशन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या शोधात कंपन्या असतात जे चांगला कंटेट लिहू शकतात. कंपनी यावर लाखो रूपये खर्च करत असतात. तुम्हाला जर लोकप्रिय व्हायचे आणि पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठीच हे क्षेत्र आहे. तुम्ही यात पार्ट टाइम काम करूनही कमाई करू शकता. सुरुवातीला ब्रँड प्रमोशन आणि कंटेट राइटिंगकरून या कामाला नंतर एक फुलटाइम प्रोफेशन बनवू शकता.

Leave a Comment