ही महिला रोबोटिक वेश्यालयातून करणार समाज सुधारणा

prostitution
न्यूयॉर्क – क्राउडफंडिंग हे गरजवंतांसाठी अनोळखी लोकांकडून ऑनलाइन निधी गोळा करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून लोक या ठिकाणी आप-आपल्या किंवा लोकांच्या समस्या मांडून त्यांच्यासाठी निधी गोळा करतात. बहुतांश लोक यात आपल्या गंभीर आजारासाठी, रस्त्यावर सापडलेल्या अनाथ मुलांसाठी किंवा एखाद्या मोहिमेसाठी मदत मागत असतात. पण चक्क सेक्स डॉलचे वेश्यालय उघडण्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करण्याची विनंती अमेरिकेतील एका महिलेने केली आहे. समाजात आपले हे वेश्यालय सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मोहिम ठरेल असा दावा ती करते. त्याचबरोबर विवाहित महिलांना ती आवाहन करते की आप-आपल्या पतींना या वेश्यालयात त्यांनी देखील अवश्य पाठवावे.

या महिलेचे नाव युनिकोल युनिकॉर्न असे असून १.२० लाख ब्रिटिश पाउंडचा निधी गोळा तिने करण्यासाठी क्राउडफंडिंग वेबसाइटवर विनंती केली. लोक तिच्यावर तेव्हापासूनच संताप व्यक्त करत आहेत. काही असेही आहेत की ज्यांनी तिच्या या मोहिमेचे समर्थन केले. तिची ब्रिटिश आणि अमेरिकेतील विविध माध्यमांनी मुलाखत घेऊन सविस्तर माहिती जाहीर केली. युनिकोल म्हणते, की अशा प्रकारचे वेश्यालय सुरू करून ती समाजाची सेवा करणार आहे.

जगभरात महिलाविरोधी अत्याचार वाढत असताना पुरुषांना महिलांची परवानगी घेण्यास शिकवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. आपण या वेश्यालयात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हीच गोष्ट शिकवणार आहोत. क्स डॉल ह्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाने सज्ज अशा येथील सेरोबोटिक डॉल असतील. पुरुषांना त्यांच्याकडूनच महिलांशी कसे वागावे ह्या गोष्टी आपण शिकवणार असल्याचे ती म्हणते.

रोबोटिक सेक्स डॉल सद्यस्थितीला बाजारात उपलब्ध असल्या तरीही त्या कन्सेंट देऊ शकतील एवढ्या आधुनिक नसल्यामुळे, युनिकोलचे दावे खोटे आणि फक्त आपला हेतू साध्य करण्यासाठी आहेत अशी टीका तिच्यावर होत आहे. त्यावर बोलताना, अशा डॉल आज नसतील तरीही भविष्यात अशा डॉल बाजारात अवश्य असतील. आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत. रोबोटिक बाहुल्यांचे वेश्यालय येत्या काही दिवसांत सुरू होत असून त्यातून होणाऱ्या कमाईतून दिवसेंदिवस टेक्नोलॉजी विकसित करत राहीन असे तिने सांगितले.

युनिकोल ही एक मॉडेल आणि व्हाइस आर्टिस्ट असून तिने दोन वर्षांपूर्वीच आपला एक पॉर्न व्हिडिओ डीव्हीडी रिलीज केला होता. त्याची ऑनलाईन आणि ऑफलाइन प्रति तिने डीव्हीडी २०० पाउंड अर्थात जवळपास २० हजार रुपयांत विक्री केली. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर न्यूड आणि सेमी न्यूड फोटो पोस्ट करणाऱ्या युनिकोलचे १४ हजार फॅन्स आहेत. काही लोकांनी तिची मोहिम ऐकूण तिला दिवाळखोर असेही म्हटले आहे.