शास्त्रज्ञांनी मोजले आकाशातील तारे

nasa
आपल्यापैकी अनेकांनी आकाशातील तारे मोजण्याचा प्रयत्न केला असणार आणि हा प्रयत्न अगदी काही वेळातच सोडूनही दिला असणार. पण त्यानंतर देखील अनेकांना आकाशात तारे नक्की किती हा प्रश्नही पडतो. पण आता पृथ्वीवरून दिसणाऱ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये किती तारे आहेत हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. सायन्स या नियतकालिकेत यासंदर्भातील एक अहवालच छापण्यात आला आहे.

पृथ्वीवरून दिसणाऱ्या एकूण चमकणाऱ्या ताऱ्यांची संख्या या अहवालानुसार ४ वर ८४ शी शून्य म्हणजेच गणिती भाषेत लिहायचे झाले तर ४x१०^८४ इतके आणि अंकातच सांगायचे झाले तर ४,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,०००,००० एवढी संख्या होते.

अहवालानुसार एखाद्या ताऱ्यामधून निघणाऱ्या प्रकाशाच्या गोळ्यांचाही या आकडेवारीमध्ये समावेश आहे. आम्ही ही माहिती ‘फेर्मी टेलिस्कोप’च्या मदतीने गोळा केली असून यामध्ये विश्वामधील तारे आणि त्यांमधून निघणारे तेजस्वी प्रकाश गोळे या सर्वांचा समावेश आहे. याआधी कधीही अशाप्रकारची मोजणी झालेली नाही अशी माहिती अहवाल संशोधकांचे नेतृत्व करणारे क्लॅम्पसन विद्यापिठातील खगोलशास्त्रज्ञ असणाऱ्या मार्के अॅलिओ यांनी दिली.

आकाशगंगेमध्ये ताऱ्यांमधून निघणारे प्रकाशगोळे हे कायम राहतात. अशाप्रकारचे प्रकाशगोळे अस्तित्वात असलेला प्रत्येक तारा उत्सर्जित करीत असतो. या अशाच प्रकाशगोळ्यांमुळे वेगवेगळ्या ताऱ्यांची आणि आकाशगंगांची निर्मिती कधी आणि कशी झाली याचा अभ्यास करणे सोप्पे जाते असे मतही अॅलिओ यांनी व्यक्त केले आहे. नासाच्या ‘फेर्मी’ या गॅमा रे टेलिस्कोपच्या मदतीने मागील नऊ वर्षांपासून ही ताऱ्यांची मोजणी सुरु होती.

Leave a Comment