पी. चिदंबरम यांचे आव्हान नीती आयोगाने स्वीकारले

niti-aayog
नवी दिल्ली – काँग्रेस आणि भाजपमध्ये देशाच्या आर्थिक धोरणावरुन सुरू असलेले वाकयुद्ध जीडीपीच्या विश्वासाहर्तेपर्यंत येऊन पोहोचले असून सुधारीत जीडीपीच्या आकडेवारीत सध्याच्या एनडीए सरकारच्या काळातील आर्थिक प्रगती ही पूर्वीच्या युपीए सरकारहून अधिक असल्याचे दिसून आले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावरुन जीडीपीच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी याबाबत दिलेले आव्हान नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्वीकारले आहे.

आपल्या ट्विटमध्ये राजीव कुमार यांनी म्हटले आहे, की आदरणीय, पी. चिदंबरमजी, तुमचे आव्हान स्वीकारले आहे. आपण मागील जीडीपीच्या आकडेवारीबाबत चर्चा व विश्लेषण करू. माध्यमांना मी काल (गुरुवारी) ३ तास मुलाखत दिल्यामुळे माध्यमांना प्रश्न विचारु दिले नाही, असे तुम्ही म्हणणे चुकीचे आहे. तुम्हाला नव्या जीडीपीच्या आकडेवारीवर काय अडचण आहे, याची तर्कसंगत कारणे द्या, असे कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पी. चिंदबरम यांनी त्यापूर्वी नीती आयोगाला नव्या जीडीपीच्या आकेडवारीवरुन आव्हान दिले होते. पी. चिंदबरम यांनीही राजीव कुमारांच्या ट्विटला उत्तर देताना ट्विटमधून उत्तर दिले. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, चर्चेला ते तयार झाल्याचे मला आश्चर्य वाटते. कारण पत्रकारांना राजीव कुमार म्हणाले होते, की प्रश्न उत्तर देण्याच्या पात्रतेचे ते नाहीत. आणखी ट्विट करत राजीव कुमार यांनी नीती आयोग हा डाटाचा उपयोग तर्काला अनुसरुन धोरण करण्यासाठी करतो. तज्ज्ञांकडून या डाटाचे मुल्यांकन आणि महत्त्वाच्या सांख्यिकी केले जात असल्याचे स्पष्ट केले.

आर्थिक धोरणावरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सातत्याने भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. जीडीपीच्या आकेडवारीवरच प्रश्नचिन्ह उमटल्याने राजीव कुमार आणि पी. चिदंबरम यांच्या चर्चेतून काय साध्य होते, याकडे अर्थजगताचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment