सुंदर समुद्रात असलेल्या या तुरुंगात एकाच कैदी

amreki-jail
भारतातील तुरुंग, तेथील कैदी याच्या परिस्थितीची नेहमीच चर्चा होत असते. भारतात तुरुंगांच्या क्षमतेच्या कितीतरी अधिक प्रमाणात कैदी आहेत हे जगजाहीर आहेच. मात्र भारतातच एक तुरुंग असाही आहे ज्यात एकच कैदी आहे. गुजरात जवळच्या दिव या केंद्रशाषित प्रदेशातील अमरेली या उपतुरुंगात सध्या एकच कैदी असून त्याच्या तैनातीत पाच शिपाई आणि एक जेलर आहेत.

समुद्रात एखादा किल्ला असावा असा हा तुरुंग दीर्घकाळ पोर्तुगीज अखत्यारीखाली होता. हा एक किल्लाच असून तो ४७२ वर्षे जुना आहे. वास्तविक २०१३ साली हा तुरुंग बंद केला जाणार असल्याची घोषणा केली गेली होती. या तुरुंगात काही वर्षापूर्वी ७ कैदी होते, त्यात २ महिला कैदी होत्या. यातील चार कैदी अहमदाबाद येथील तुरुंगात नेले गेले तर अन्य दोघांची शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांना सोडून दिले गेले. सध्या येथे ३० वर्षीय दीपक कांजी नावाचा एकच कैदी असून त्यच्यावर पत्नीला विष घालून मारल्याचा आरोप आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली कि त्याला अन्यत्र हलविले जाणार आहे.

divjail
भारतीय पुरातत्व विभागाने अनेक दिवसापासून या भागाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जावा यासाठी प्रयत्न चालविले आहेत. दिव पासून १०० किमीवर असलेल्या गुजराथ किनार्याला जोडणारा एक पूल येथे आहे. सध्या या तुरुंगात असलेल्या दीपकला वेळ घालविणे अवघड जाते. त्यामुळे त्याला मासिके, टीव्ही पाहण्याची तसेच दोन दास शिपायांच्या पहाऱ्यात फिरण्याची सुविधा दिली गेली असून त्याचे जेवण रेस्टोरंट मधून मागविले जाते. या तुरुंगाच्या बराकीत २० कैदी राहू शकतात तेथे दीपक एकटाच आहे.

Leave a Comment