फुटबॉल खेळाडू अडकलेल्या थायलंडच्या गुहेचे पर्यटनस्थळ बनले

cave
उत्तर थायलंडच्या ज्या गुहेत युवा फुटबॉल खेळाडूंच्या टीममधील १२ खेळाडू १७ दिवस अडकून पडले होते तेथे आता पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे. येथे एक सुंदर उद्यान बनविले गेले असून १६ नोव्हेंबर पासून ते पर्यटकांना खुले केले गेले आहे. या पार्क मध्ये विविध वस्तू विकणारी १०० पेक्षा अधिक दुकाने सुरु झाली आहेत. तेथे फुटबॉल टीमचे स्मृतीचिन्ह, टीशर्ट व अन्य सामानाची विक्री केली जात आहे.

cave1
थायलंडच्या चीयांग भागातील हि गुहा मात्र अजून पर्यटकांसाठी खुली केली गेलेली नाही. जूनमध्ये या गुहेत युवा फुटबॉल संघाचे १२ सदस्य फसले होते आणि जगभरातील ६० पाणबुड्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोहीम चालविली होती. त्यात सामन गुआन या पाणबुड्याला मृत्यू आला होता. त्याच्या स्मरणार्थ येथे एक संग्रहालय बनविले गेले आहे.

या गुहेत खेळाडू अडकल्यापासून हि गुहा जगप्रसिद्ध झाली आहे आणि जगभरातील पर्यटक येथे गर्दी करू लागले आहेत. त्यांच्यासाठी टेंट रिसोर्ट बांधले गेले आहे.

Leave a Comment