झेडटीईने आणला १० जीबी रॅमचा नुबिया रेड गेमिंग फोन

rednubia
झेडटीईने नुबिया रेड मॅजिक मार्स नावाने लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला असून ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि १० जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज अश्या व्हेरीयंट मध्ये तो सादर केला गेला आहे. त्याच्या किंमती २७४३० ते ४०,५९० भारतीय रुपये अश्या आहेत. हा फोन ७ डिसेंबरपासून ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या फोनला ६ इंची फुल एचडी डिस्प्ले, उत्तम गेमिंग ऑडीओ साठी डीटीएस ७.० ऑडीओ, ड्युअल हीट पाईप सह कन्व्हेक्शन कुलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. यामुळे फोनचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. फोनला रिअल साईडला ड्युअल टोन एलइडी फ्लॅश सह १६ एमपीचा तर सेल्फीसाठी वाईड अँगलसह ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. हा फोन अँड्राईड ९.० पाय ला सपोर्ट करतो. त्याला क्विक चार्ज होणारी ३८०० एमएएचची बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment