अजमेरला भागेल मनमुराद शॉपिंगची हौस

mahila
सुफी संत मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याला भेट देण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर विदेशातून भाविकच नाही तर सर्व जातीधर्माचे पर्यटक येत असतात. अजमेर या दर्ग्याबारोबारच मनपसंत खरेदीसाठीही प्रसिद्ध असून येथे शॉपिंग साठी अनेक बाजार आहेत जेथे सर्व प्रकारचे सामान विकले जाते.

chudi-
चुडी बाजार हा नावाप्रमाणेच बांगड्यांचा बाजार असून येथे काच, मेटल, स्टील, प्लास्टिक बरोबर सोन्या चांदीच्या असंख्य प्रकारच्या बांगड्या मिळतात. महिला वर्गाच्या हौसेला हा बाजार पुरून उरतो.

durgah
महिला मंडी नावाचा आणखी एक बाजार असाच लोकप्रिय असून त्यात महिलांना लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. उत्तम प्रकारचे खास राजस्थानी कपडे, बॅग्स, चपला, मोजड्या येथे जितक्या व्हरायटीमध्ये मिळतील तितक्या अन्यत्र मिळणे अवघड.नाला बाजारात पारंपारिक कपडे, टाय डाय दुपट्टे, साड्या, मोजडी येथे मिळतातच पण शॉपिंग करून दमला असला तर टेस्टी स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो.

juti
दर्गा बाजार हा आणखी एक बाजार सतत गर्दीने फुललेला असतो. येथे ज्वेलरी, अँटिक वस्तू, पेंटिंग, लाकडी समान, जुती याची चांगली रेंज मिळते. येथे विशेष म्हणजे घासाघीस करण्याचे समाधानही मिळू शकते. नॉनव्हेजप्रेमींसाठी येथील बिर्याणी आणि मटण करी जिव्हा तृप्ती करणारी ठरते.

Leave a Comment