सुरेश रैनाच्या पत्नीने उलगडले पतीचे बेडरूम सीक्रेट

suresh-raina
२७ नोव्हेंबरला भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने वयाच्या ३२व्या वर्षात पदार्पण केले आहे. फक्त क्रिकेटमध्येच नाही, तर आणखीही एका क्षेत्रात आपल्या तडाखेबंद फलंदाजी करणारा सुरेश रैना तरबेज आहे. टीव्ही शो मिस फील्डमध्ये रैनाची पत्नी प्रियंकाने आपल्या पतीची काही गुपिते उघडकीस आणली होती.

प्रियंका शोमध्ये बोलताना म्हणाली, फक्त क्रिकेटरच नव्हे, तर चांगला गायकही सुरेश रैना आहे. गाण्याचा तो इतका शौकीन आहे की घरात कुठेही गात राहतो. त्याचबरोबर बेडरूममध्ये अतिशय खासगी क्षणांमध्ये असतानासुद्धा तो गातो, असा खुलासा त्याच्या पत्नीने केला. आपल्या पतीचे हे सीक्रेट उघडकीस आणताच प्रियंकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

४ एप्रिल २०१५रोजी सुरेश रैना आणि प्रियंका याचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. पण लग्नाच्या २० वर्षांपूर्वीपासून हे दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. प्रियंका जेव्हा अवघ्या १० वर्षांची होती तेव्हापासून ती सुरेशची मैत्रिण आहे. ज्या शाळेत सुरेश रैना जायचा तेथील शिक्षक प्रियंकाचे वडील होते. प्रियंकाच्या वडिलांनीच लहानपणी रैनाला स्पोर्ट्स कोचिंग सुद्धा दिली. यासोबतच सुरेश रैना आणि प्रियंका या दोघांच्या आई सुद्धा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या.