१ हजार अभियांत्रिकी पदवीधरांची नियुक्ती करणार सॅमसंग इंडिया

samsung
नवी दिल्ली – देशभरातील १ हजार अभियांत्रिकीच्या पदवीधरांना सॅमसंग इंडियाकडून नोकरीची संधी मिळणार आहे. देशभरातील टॉप महाविद्यालये, तसे विविध आयआयटीमधून हे विद्यार्थी निवडले जाणार आहेत.

याबाबत माहिती देताना सॅमसंग इंडियाचे प्रमुख (मनुष्यबळ) समीर वाधवान यांनी सांगितले की, १ डिसेंबरपासून दिल्ली,कानपूर, मुंबई, मद्रास, खरगपूर, गुवाहटी, रुरकी या शहरांना भेटी दिल्या जाणार आहेत. अभियंत्यांच्या निवड चाचणी यावेळी घेतल्या जाणार आहेत.

कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, कॅमेरा टेक्नॉलॉजी आणि ५ जी नेटवर्क अशा प्रगत तंत्रज्ञानातील अभियंते निवडले जाणार आहेत. संशोधन आणि विकासासाठी येत्या तीन वर्षात २ हजार ५०० अभियंत्यांना नोकऱ्या दिली जाणार असल्याचेही वाधवान यांनी सांगितले. देशात दिल्ली, नोईडा आणि बंगळुरूमध्ये सॅमसंग इंडियाचे संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. वाधवान म्हणाले की लवकर हुशार विद्यार्थ्यांना कंपनीत घेतले जाणार आहे. कंपनीतील प्रशिक्षणाचा काळ जास्त असल्याने विद्यार्थी अधिक काळ कंपनीत घालवू शकतात. आजपर्यंत २ हजार ९०० पेटंटसाठी सॅमसंगने अर्ज केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना हेरण्यासाठी यंदा सॅमसंगने ३५० प्री-प्लेसमेंट ऑफिसरची नियुक्ती केली आहे.

Leave a Comment