मिझोरममध्ये राहत आहे जगातील सर्वात मोठा परिवार

mizoram
जगातील सर्वात मोठे कुटुंब आपल्या देशातील मिझोरमची राजधानी ऐझॉल येथे राहते. या कुटुंबाचे झियोना चाना हे प्रमुख आहेत. सध्या या कुटुंबात १८१ सदस्य आहेत. अनेकांनी एका साबणाच्या जाहिरातीत झियोना चाना यांच्या कुटुंबाला आधीही पाहिले असेल. त्यांना एकूण ३९ पत्नी, ९४ मुलं, १४ सूना आणि ३३ नातवंडे आहेत. आपल्या ३९ पत्नींसोबत झियोना चार मजल्यांच्या एका मोठ्या घरात राहतात. १०० हून अधिक या घराला खोल्या आहेत.

आपल्या ३९ पत्नींसोबत चाना हे सुखाने संसार करत आहेत. झिओन यांच्या पत्नींपैकी वयाने मोठी असलेली एक कुटुंबातील इतर महिलांमध्ये भांडणे तर होणार नाही ना, याची पुरेपूर काळजी घेते. या प्रत्येकीला तिच घरची कामे आणि जबाबदाऱ्या वाटून देते. कुटुंबासाठी झिओन यांनी काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांचे घरातील प्रत्येक सदस्य पालन करतात.

आता झिओन ७१ वर्षांचे झाले असून ते अशा पंथातले आहेत जिथे पुरूषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आहे. त्यांनी त्यानुसारच ३९ लग्न केली आहेत. म्हणूच १८१ सदस्य असलेले हे कुटुंब भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे कुटुंब ठरले आहे.

Leave a Comment