संपूर्ण देशात बदनाम आहे हे शहर; तरुणींच्या देहाचा सौदा होतो अवघ्या २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

dhadicha
भारतामधील मेट्रो सिटींशिवाय अनेक राज्यांतील विविध शहरांचा रेड लाइट एरियांचा समावेश आहे. दिल्ली, वाराणसी, कोलकात्याव्यतिरिक्त इतरही अनेक शहरांतील हा रेड लाइट एरिया तेथे येणाऱ्या बाहेरील लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. पण आम्ही तुम्हाला आज मध्य प्रदेशातील अशा एका रेड लाइट एरियाविषयी माहिती देणार आहोत. येथील एक गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुन्न व्हाल. मध्य प्रदेशाबद्दल ज्यांच्याकडे माहिती असेल त्या लोकांना येथील शिवपुरी गावाविषयीसुद्धा माहिती असेल. मध्यप्रदेशातील शिवपुरी एक बदनाम ठिकाण असून अत्यंत कवडीमोल भावात येथे मुलींची बोली लावली जाते.
dhadicha1
संपूर्ण देशात मुलींच्या खरेदी-विक्रीसाठी बदनाम असलेल्या या ठिकाणी दररोज छापे पडत राहतात. बेकायदेशीररीत्या याठिकाणी मुलींचा सौदा केला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, फक्त २० रुपयांच्या सरकारी स्टॅम्पवर मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे मुलींना विकले जाते. खरंच…! हे ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवणे अवघड जाईल. पण हे सत्य आहे. एक प्राचीन प्रथा या संपूर्ण काळ्या धंद्यामगे आहे. येथे अनेक वर्षांपासून मुलींच्या खरेदी-विक्रीचा हा काळा धंदा सुरु आहे. ‘धडीचा’ नावाने ही प्राचीन प्रथा ओळखली जाते. ही प्रथा सरकारच्या खूप प्रयत्नानंतरही अजूनही संपुष्टात आलेली नाही.
dhadicha2
‘धडीचा’ प्रथेच्या नावाखाली येथील स्थानिक लोक अनेक वर्षांपासून मुलींचा सौदा करत आहेत. चक्क काँट्रॅक्टवर मुलगी विकत घेण्यासाठी स्वाक्षरी घेतली जाते. एक रात्रीचे हे कॉन्ट्रॅक्ट असते. पण कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जास्त पैसे दिले तर आणखी जास्त काळासाठी वाढवले जाते. एका पुरुषासोबत कॉन्ट्रॅक्ट संपले की मुलीला दुसऱ्या पुरुषासाठी तयार केले जाते.

Leave a Comment