आपले मतदान ओळखपत्र या सोप्या पद्धतीने मिळवा

voter-ID
सध्याच्या मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानापुरते मर्यादित न राहता ते आता ओळखपत्र म्हणून वापरले जाते. आता या मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयाच्या खेपा माराव्या लागणार नाही. तुम्हाला यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करता येणार आहे.

आता मतदान ओळखपत्राची गरज आधार कार्डनंतर वाढली आहे. कारण हे मतदान ओळखपत्र फक्त मतदानासाठी नव्हे तर ओळखपत्र म्हणून त्याचे महत्त्व वाढले आहे. जर आतापर्यंत तुम्ही मतदान ओळखपत्र बनवले नसेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला मतदान ओळखपत्रासाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. यासाठी तुमच्याकडे शिक्षण संस्थेचा शाळा सोडल्याचा दाखला, भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

तुम्हाला मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल. नॅशनल वोटर सर्विसेज पोर्टल (National Voter Services Portal) या वेबसाईटवर जाऊन Apply online for registration of new voter/due to shifting from AC यावर क्लिक करा. यानंतर फॉर्म ६ ची विंडो उघडेल. त्यात दिलेला तपशील भरा. तुम्हाला वेबसाईटवर दिलेली भाषा समजत नसेल तर सगळ्यात वरील बाजुला ड्रॉप डाऊन मेन्युवर क्लिक करून तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा. यानंतर आपआपल्या राज्यातील विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्र निवडल्यावर तुमचे नाव, वय आणि पत्ता भरा.

तपशील भरून झाल्यावर तेथे संपर्क (Contact) तपशील द्यावा आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचे नाव मतदान यादीत आहे त्या सदस्यांची माहिती भरावी. ज्यावर स्टारचे चिन्ह असेल तिथे आवश्यक तपशील भरणे बंधनकारक आहे. यानंतर तुमच्या जवळ असलेल्या कागदपत्रांची स्कॅन फाईल अपलोड करावी. फॉर्म भरल्यानंतर ठिकाण आणि तारीख नमूद करावी.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही भरलेला फॉर्म सेव्ह करा. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे. क्लिक केल्यावर तुम्हाला लिंकसोबतच एक ईमेल मिळेल. त्यामुळे तुम्ही मतदान ओळखपत्र अर्जाची हालचाल तुम्हाला कळेल. यानंतर तुम्हाला ३० दिवसांच्या आत तुमचे मतदान ओऴखपत्र नमूद केलेल्या पत्त्यावर दिले जाईल.

Leave a Comment