ट्रम्प लपवत आहेत पत्रकार खशोग्गींच्या हत्येमागील सत्य – हिलरी क्लिंटन

hillary-clinton
वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदीचे पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येमागील सत्य लपवत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केला आहे. खशोग्गींच्या मृत्यू प्रकरणाला ट्रम्प ‘कव्हर-अप’ करत असल्याचे हिलरी म्हणाल्या. सौदीच्या दुतावासामध्ये २ ऑक्टोबर रोजी खशोग्गी यांची हत्या करण्यात आली होती.

खशोग्गी यांच्या हत्येमागील सत्य ट्रम्प आणि त्यांच्याजवळील काही लोक स्वत:च्या आर्थिक स्वार्थापोटी लपवत असल्याचा आरोप हिलरी यांनी केला आहे. सौदीचे राजे मोहंमद बिन सलमान यांना खशोग्गींच्या हत्येची पूर्वकल्पना होती, असे वक्तव्य ट्रम्प यांनी २० नोव्हेंबर रोजी केले होते. या प्रकरणानंतरही अमेरिकेचे रियाधसोबतचे संबंध तसेच राहतील, असेही ट्रम्प म्हणाले होते.

सौदीच्या राजघराणे आणि राजे सलमान यांचा खशोग्गी यांच्या हत्येमागे हात नाही, असे सौदीकडून सांगण्यात आले होते. खशोग्गी यांच्या हत्येमागे राजे मोहंमद बिन सलमान यांचा हात असल्याचा ट्रम्प यांचा आरोप सौदीकडून फेटाळण्यात आला आहे.