१ फेब्रुवारीला हंगामी बजेट सादर करणार अरुण जेटली

arunj
आगामी लोकसभा निवडणुकापूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारी २०१९ ला सादर करणार आहेत. त्याची तयारी अगोदरच सुरु झाली असून विविध मंत्रालायांकडून अर्थसंकल्पीय भाषणासाठी मुद्दे मागविले गेले आहेत असे समजते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट असेल. जेटली सलग ६ व्या वेळी बजेट सादर करणार आहेत.

येत्या ३ डिसेंबरपासून मिडीयाला अर्थ मंत्रालयाचे कार्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉक मध्ये प्रवेश बंदी केली गेली असून ती १ फेब्रुवारी पर्यंत लागू राहणार आहे. निवडणूक वर्षात अर्थसंकल्प सादर करताना गरजेच्या आवश्यक सरकारी खर्चासाठी लेखानुदान घेतले जाते आणि नवीन सरकार संपूर्ण बजेट सत्ता हाती आल्यावर सादर करते अशी प्रथा आहे. त्यामुळे या बजेटला हंगामी म्हटले जाते.

Leave a Comment