उबर,ओला ला टक्कर देणार नवीन रेव टॅक्सी सेवा

revv
देशात चांगल्याच रुळलेल्या ओला आणि उबेर टॅक्सी सेवेशी स्पर्धा करण्यासठी आणखी एक नवी टॅक्सी सेवा सुरु होत असून तिचे नाव आहे रेव टॅक्सी. हुंदाई मोटर्सच्या साथीत व्यवसायात उतरलेली हि कंपनी मासिक भाडे तत्वावर सेवा देणार आहे. हे ३ वर्षे जुने स्टार्टअप लाँग टर्म सब्स्क्रीप्शन सह बाजारात उतरत आहे. मासिक सदस्यता शुल्क पद्धतीने ते व्यवसाय विस्तार करणार आहेत.

या सेवेत युजर होंडा सिटी, मारुती आल्तो, हुंदाई क्रेटा सह २५ कार मॉडेल्स मासिक भाडे पद्धतीवर घेऊ शकणार आहे. त्यामुळे नवीन कार घेताना करावे लागणारे विमा, टॅक्स, देखभाल असले व्याप करण्याची गरज राहणार नाही. स्टँडर्ड हचबॅक मोडेल साठी महिना १८ ते २० हजार तर स्विफ्ट एलएक्सआय साठी २०४८४ रु. मासिक भाडे द्यावे लागेल.

गुरुवार पासून हि सेवा सहा मेट्रो शहरात सुरु होत असून पुढच्या आठवड्यात ती ९ शहरात सुरु होणार आहे. या स्टार्टअपची सुरवात २०१५ साली अग्रवाल आणि जैन या दोघांनी सुरु केली होती. हुंदाई मोटर्सच्या नेतृत्वाखाली त्यांनी १ अब्ज रु.गुंतवणूक केली असल्याचे समजते. विशेष म्हणजे महिंद्रानेही अशीच सेवा सुरु केली असून त्यात १३४९९ ते ३२९९९ रु. मासिक भाडे भरून महिंद्राचा कार्स ग्राहक वापरू शकणार आहेत.

Leave a Comment