हा आहे जगातील महाकाय ट्रॅक्टर

bigbud
जगभरात ऑटो इंडस्ट्रीचा विकास वेगाने होत आहे आणि दररोज नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केली गेलेली फीचर्स वाहनात वापरली जात आहेत. ट्रॅक्टर हा सर्वसामान्यपणे शेतीच्या कामात वापरला जातो. ट्रॅक्टर मध्येही आता अनेक नवीन बदल झाले असून अत्याधुनिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. मात्र १९७७ साली बनविल्या गेलेल्या एका ट्रॅक्टरचे नाविन्य अजूनही ओसरलेले नाही. बिग बड १६व्ही ७४७ या नावाचा हा ट्रॅक्टर आजही जगातील महाकाय ट्रॅक्टर आहे.

एखादा राक्षसी रोबो असावा तसा दिसणारा हा ट्रॅक्टर पॉवरच्या दृष्टीनेही राक्षसी आहे. एक एकर शेत तो एक मिनिटात नांगरतो. त्याची लांबी २८ फुट, रुंदी २० फुट असून त्याला २४.१ लिटरचे १६ सिलिंडर डीझेल इंजिन ६ स्पीड ट्रान्समिशन सह दिले गेले आहे. त्याचा वेग ताशी मैल असून त्याच्या इंधन टाकीची क्षमता आहे १ हजार गॅलन . त्याला दोन टर्बो चार्जर आणि दोन सुपरचार्जर दिले गेले आहेत.

या ट्रॅक्टर साठी सर्वप्रथम अमेरिकेच्या कापूस उत्पादक शेतकरी बंधू रोस्सी यांनी ऑर्डर नोंदविली होती. त्य्कली त्याची किंमत ३ लाख डॉलर्स होती आणि कॅनडातील युनायटेड टायर कंपनीने या ट्रॅक्टरसाती ८ फुट उंचीचे टायर तयार केले होते.