रहस्यमयी फुन्दुजी सरोवराला भेट दिलीत?

panduji
जगाच्या पाठीवर पोटी रहस्य बाळगून असलेली अनेक ठिकाणे आहेत. कुठे हवेल्या, कुठे मंदिरे, कुठे जंगले, कुठे नद्या सरोवरे अशी हि अनेक ठिकाणे आहेत. आजच्या विज्ञान युगात संशोधकांनासुद्धा या रहस्याचा उलगडा करता आलेला नाही. असेच एक सरोवर द. आफ्रिकेतील ट्रान्सवाल भागात असून जो कुणी या सरोवरात गेला तो परतला नाही अशी त्याची ख्याती आहे. येथील पाणी प्रदूषित नाही. या भागात विषारी वायू नाहीत तरीही या सरोवरात उतरणारा जिवंत राहत नाही असे सांगितले जाते. त्यामुळे हे सरोवर शापित मानले जाते.

आजवर अनेक संशोधकांनी यामागाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती काही लागू शकले नाही. असे सांगतात कि २० हजार वर्षापूर्वी जमीन धसल्याने हे सरोवर निर्माण झाले. या सरोवरात मुटाली नदीचे पाणी येते मात्र ते कुठून येते ते समजत नाही. स्थानिक लोक सांगतात या सरोवरात एक पांढरा अजगर आणि पांढरी मगर आहे. तसेच येथे उर्वर देवतेचा निवास आहे. या सरोवराचे पाणी समुद्राच्या भरती ओहोटी प्रमाणे कमी जास्त होत असते.

funduzi
येथील स्थानिक या सरोवरातील देवतेला प्रसन्न करण्यासाठी डोंबा नृत्य करतात. फार पूर्वी या सरोवरात दरवर्षी कुमारी मुलीचा बळी दिला जात असे. येथे अनेक पर्यटक भेट देतात. तेव्हा काही प्रथा येथे पाळाव्या लागतात. सरोवराकडे पाठ करून उभे राहायचे. मग पुढे वाकून दोन पायाच्या मधून सरोवर पाहायचे आणि याच अवस्थेत छोट्या दगडावर थुंकून तो खडा पायाच्या मधून सरोवरात टाकायचा म्हजाजे या सरोवराची बाधा होत नाही असा समज आहे.

सरोवराचा परिसर आणि खुद्द सरोवर अतिशय रमणीय आहे मात्र त्याच्य्भोवती असलेल्या रहस्याचा वलयामुळे येथे पर्यटकांची खूप गर्दी नसते असेही समजते.

Leave a Comment