भारतामध्ये चलनात असलेल्या या पदार्थांवर परदेशांत मात्र बंदी !

ban
आपण खातो ते अन्नपदार्थ किती तरी निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर येत असतात. यांच्या चवी निराळ्या, रूप निराळे, रंग निराळे आणि बनविण्याच्या पद्धतीदेखील निराळ्याच. आपल्या दैनंदिन आहारामध्ये अनेक पाश्चात्य पदार्थांचा स्वीकारही आपण केला आहे. आता हे पदार्थ आपल्या दैनंदिन आहारामध्ये इतके रुळले आहेत, की हे पदार्थ आपल्याकडील नाहीतच हे सांगूनही खरे वाटणार नाही. यातील बहुतांश पदार्थ आता भारतामध्ये देखील तयार केले जाऊ लागले आहेत. मात्र आपल्याकडे चलनामध्ये असलेल्या काही पदार्थांवर इतर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हे पदार्थ कोणते, ते जाणून घेऊ या.
ban1
आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या आणि अतिशय पौष्टिक समजल्या जाणाऱ्या साजूक तुपावर अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने बंदी घातलेली आहे. त्यामुळे तेथील सुपरमार्केट्स मध्ये किंवा दुकानांमध्ये साजूक तूप विक्रीस ठेवल्याचे अभावानेच आढळते. तसेच आपल्याकडे सर्रास मिळणाऱ्या ‘जेली कँडी’ वर देखील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा पदार्थ अतिशय चिकट असून, लहान मुले हा पदार्थ खात असताना त्यांच्या घशामध्ये हा पदार्थ अडकून, त्यांचा श्वास कोंडण्याचा धोका लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे.
banm
एखाद्या सँडविचच्या सोबत किंवा अगदी पोळीबरोबर आवडीने खाल्ले जाणारे टोमाटो केचप फ्रांस मध्ये ‘बॅन’ केले गेले आहे. या केचपच्या वापराने अन्नपदार्थाची मूळ चव बदलत असून, किशोरवयीन मुलांमध्ये केचप खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे दिसून आल्यानंतर केचपवर बंदी घालण्याचा निर्णय फ्रांस सरकारने घेतला आहे. तसेच सिंगापूर या देशामध्ये च्युईंग गमवर बंदी आहे. या देशाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील सोबत च्युईंग गम आणण्याची परवानगी नाही. कोणी च्युईंग गम चघळताना आढळलाच, तर त्याला दंड ठोठाविण्यात येतो. तसेच भारतामध्ये लहान मुलांच्या आवडत्या ‘किंडर जॉय’ वरही अमेरिकेमध्ये बंदी आहे.

Leave a Comment