मैसूरच्या या कारखान्यात बनते मतदानाची खूण केली जाणारी शाई

inkele
देशात सध्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत आणि पुढील वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. मतदाराने मतदान केल्याची खूण म्हणून बोटावर जी शाई लावली जाते ती गेली ५६ वर्षे मैसूर येथे बनविली जात आहे याची अनेकांना माहिती नसेल. हि शाई सर्वप्रथम मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मैसूर इंक लॅक अँड पेंट लिमिटेड या कारखान्यात बनविली गेली मात्र तिचा प्रथम वापर १९६२ मध्ये केला गेला. त्यानंतर आजतागायत हीच शाई निवडणूक प्रक्रियेत वापरली जात आहे.

mysore
हा कारखान्याचे नाव आता मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमी. असे असून हि शाई येथून मालदीव, अफगाणिस्थान, कंबोडिया, मलेशिया, इजिप्त, द.आफ्रिका या देशात निर्यात केली जाते. या शाईसाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो. हे जांभळ्या रंगाचे विशेष रसायन सूर्यप्रकाशात रंग बदलते आणि सहजी ते घालविता येत नाही. भारतात हाताच्या नखाखाली हि शाई मतदान केल्यावर लावली जाते तर मालदीव कंबोडियात बोट या शाईत बुडविले जाते. बुरांडी, बुर्कीनो फासो येथे ती ब्रशने लावली जाते तर इजिप्त मध्ये त्यासाठी पेन वापरले जाते.

निवडणुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या शाईची खूप दक्षता घेतली जाते आणि तिचा चोख हिशोब ठेवला जातो. या शाईच्या एका बाटलीतून ७०० ते ८०० मतदारांच्या बोटावर खूण करता येते. उरलेली शाई निवडणूक कार्यालयात जमा केली जाते आणि नंतर ती नष्ट केली जाते.

Leave a Comment