ब्रिटीश नोटेवर जगदीशचंद्र बोस यांचा फोटो येण्याची शक्यता

jagdish
प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि वनस्पतीनाही जीव असतो हा महत्वाचा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस यांची प्रतिमा ब्रिटनच्या नव्याने छापल्या जाणाऱ्या नोटेवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंग्लंडने नव्या चलनी नोटेवर बोस यांची प्रतीमा छापण्याची शिफारस केली आहे. बोस यांनी वायरलेस सिग्नल पाठविण्यासाठी सेमी कंडक्टरचा वापर सर्वप्रथम केला होता आणि त्याचे अमेरिकी पेटंट मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. आगामी वर्षात हि नोट चलनात येणार आहे.

या नोटेवर छापण्यासाठी वैज्ञानिकाचे नाव सुचविण्यासाठी मते मागविली गेली होती. त्यात या वैज्ञानिकाचे ब्रिटनला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी योगदान असावे आणि संबंधित व्यक्ती जिवंत नको अशा अटी होत्या. पहिल्याचा आठवड्यात बोस यांचे नाव द्यावे यासाठी १ लाख १४ हजार प्रस्ताव मिळाले असे समजते. अन्य नावात स्टीफन होकिंग्स, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, पॅट्रीक मुरे यांच्या नावांचा समावेश आहे.

ब्रिटनमध्ये सध्या ५० पौंड मूल्याच्या ३.२ कोटी नोटा चलनात आहेत. मात्र या नोटांचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक करत असल्याचे आढळून आल्याने ऑक्टोबर मध्ये नव्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सध्याच्या नोटेवर वाफेच्या इंजिनाचा शोध लावण्रे जेम्स वॉट आणि मथ्यू बोल्टन यांच्या प्रतिमा आहेत.

Leave a Comment