कोण होता लाफिंग बुद्धा?

buddha
आजकाल भारतही चीनी वास्तू शास्त्र फेंगशुई खूपच लोकप्रिय झाले आहे. त्यात घरात सर्व प्रकारची समृद्धी वाढावी म्हणून अनेक प्रकारच्या मूर्ती, फोटो लावण्याची पद्धत आहे. त्यातील एक म्हणजे लाफिंग बुद्धा. या लाफिंग बुद्धाची मूर्ती अथवा फोटो अनेक घरात लावलेले दिसतील. पण हा लाफिंग बुद्ध नक्की कोण, कुठला आणि त्याला हे नाव का पडले याची माहिती अनेकांना नसते.

गौतम बुद्ध यांच्या अनेक शिष्यातील एक होतेई नावाचा जपानी शिष्य होता. त्याला जेव्हा आत्मज्ञान प्राप्ती झाली तेव्हापासून तो सतत हसत होता. आयुष्यभर तो हसत राहिला आणि एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करताना तेथील लोकांनाही हसवत राहिला. त्याला त्यातूनच आनंद मिळायचा. लोकांनाही त्याच्या सहवासात आनंद मिळायचा तर कधी त्याचे हसणे पाहून आश्चर्य वाटायचे. त्यावरून त्याला लाफिंग बुद्धा असे नाव पडले. त्याने कधीही उपदेश केला नाही. प्रवचन केले नाही तरीही त्याचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक होते कि लोक त्याच्याकडे ओढले जायचे आणि त्याला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू यायचे.

laughing
होतेई सांगायचा, त्याच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. तो म्हणायचा लोकांना मनमुराद हसण्यासाठी एका मूर्खाची आवश्यकता असते. परमेश्वराने हसरे जग निर्माण केले आहे. पक्षी, झाडे, फुले, चंद्र, तारे सारे हसरे आहेत आपणच फक्त रडतो. तेव्हा हसा आणि आनंदी राहा. होतेई संन्यासी होता आणि त्याची समाधी जपान मध्ये आहे. विशेष म्हणजे आजही तेथे त्याच्या समाधी जागी गेलेल्या लोकांना शांतीचा अनुभव येतो. त्याची मूर्ती घरात असेल तर पॉझीटिव्ह एनर्जी घरात भरून राहते. यामुळे त्याची मूर्ती अनेक घरात दिसते.

Leave a Comment