पैसा पोर्टलद्वारे मिळणार दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान

नवी दिल्ली – राज्यभरातील महापालिकांमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना त्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान व कर्ज हे पैसा पोर्टलद्वारे मिळणार आहेत.

दीनदयाल अंत्योदय योजनेतून दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कर्जरुपी सहकार्य करण्यात येते. पैसाचे (पोर्टल फॉर अॅफ्रोडेबल क्रेडिट आणि इंटरेस्ट सबव्हेंशन अॅक्सेस) डिझाईन अलाहाबाद बँकेने विकसित केले आहे. लाभार्थ्यांना थेट अनुदान देण्यासाठी पैसा हे पोर्टल सुरू केल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री आणि शहर व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले. लाभार्थ्यांना यातून सेवा देण्यासाठी पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणली जाईल, असेही मिश्रा यांनी सांगितले.

कौशल्य प्रशिक्षण, बचतगटांना मदत, बेघरांसाठी घरे बांधणे आणि लघुउद्योजकांना दीनदयाल योजेनेतून अनुदान दिले जाते. हे अनुदान दरमहा लाभार्थ्यांना दिले जाते. देशातील सर्व ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शेड्युल्ड बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका पैसा पोर्टलमधून जोडल्या जाणार आहेत.

Leave a Comment