काजोल अजयची ही प्रतिक्रिया ऐकून भडकली

काही वर्षांतच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून अनेक प्रसिद्ध कलाकारांना या शोमध्ये तो निमंत्रित करत असतो. या शो दरम्यान या कलाकारांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या अनेक घटना उघड होत असतात. अजय देवगन आणि काजोलने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली होती.


अजयने पत्नी काजोलविषयी करणच्या प्रश्नावर अशी काही प्रतिक्रिया दिली की हे ऐकून काजोल चांगलीच भडकली. अजय म्हणाला, काजोलचे फोटो काढण्यात मला काहीच अडचण नाही. पण अडचण ही आहे की फोटो काढल्यानंतर ती ३ तास त्याला एडिट करत बसते. असे कोण म्हातारपणी करत. काजोल अजयची ही प्रतिक्रिया ऐकून त्याच्यावर चांगलीच भडकली आणि म्हणाली, तुझे म्हातारपण, आले माझे नाही.

करणने यानंतर अजयला विचारले, आपण मित्र बनू शकतो का? यावर काजोलने अजयच्या आधी उत्तर दिले, तू माझा मित्र आहेस आणि माझी इच्छा नाही की अजयने पण तुझ्याशी मैत्री करावी. त्यानंतर अजयला करणने लग्नाची तारिख विचारली. तो यावेळी कन्फ्यूज झाला आणि म्हणाला २३ फेब्रुवारी. हे ऐकून काजोलला धक्का बसला आणि चिडून म्हणते २४ फेब्रुवारी, १९९९.