विवोचा वाय ९५ स्मार्टफोन लाँच

vivomid
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवोने त्याच्या मेक इन इंडिया योजनेतील नोयडा प्रकल्पात तयार झालेला वाय सिरीज मधील वाय ९५ हा मिड रेंज स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. स्टेरी ब्लॅक आणि नेब्युला पर्पल कलर मध्ये तो उपलब्ध आहे. या फोनची किंमत १६९९० रु. असून सर्व ऑनलाईन तसेच ऑफलाईन दुकानात तो उपलब्ध आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बजाज फायनान्सच्या डेबिट, क्रेडीट कार्डवर १५ महिने नो कॉस्ट इएमआय मध्ये तो मिळणार असून त्यासाठी महिना ११३३ रु. भरावे लागतील. पेटीएम वरून खरेदी केल्यास १५०० चा कॅश बॅक मिळेल तर जिओ ग्राहकांना फोन खरेदी केल्यास ४ हजार रु. किमतीचा ३ टीबी डेटा मिळणार आहे.

या फोनला ६.२ इंची फुल एचडी स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमोरी, ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपी व २ एमपीचा रिअर ड्युअल कॅमेरा, २० एमपी चा एआय सेल्फी कॅमेरा, रिअरला फिंगरप्रिंट सेन्सर अशी फीचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment