मंगळावर उतरले नासाचे इनसाईट लँडर

insite
मंगळाची अब्जावधी वर्षांची रहस्ये उकलण्यात महत्वाचे ठरू शकेल असे इनसाईट लँडर हे अमेरिकी अंतराळ संस्था नासाने सोडलेले यान भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास मंगळाच्या भूमीवर उतरले. या नव्या रोबोने सात मिनिटात मंगळाच्या इलीसिय्न प्लानिशीया या सपाट भागात यशस्वी लँडिंग केले आणि नासाच्या संशोधकानी एकाच जल्लोष केला. हे यान मंगळाच्या भूमध्य रेशेजवळ उतरले आहे. आता लवकरच त्याच्याकडून फोटो आणि माहिती मिळू लागेल असे समजते.

पृथ्वीशिवाय मंगळ हा एकच ग्रह आहे ज्याच्या चाचण्या नासा कडून केल्या जात आहेत. या चाचण्यात मंगळावरील जमीन, थेथे भूकंप होतात का, खनिजे कोणती आहेत, मंगळाची फिरण्याची गती आणि स्थैर्य, मंगळाचे तापमान अश्या अनेक चाचण्या केल्या जाणार आहेत. इनसाईट लँडर मंगळावर उतरण्याची सात मिनिटे फार आणीबाणीची होती कारण या वेळेत यानाला त्याचा वेग ताशी २० हजार किमीवरून कमी करायचा होता. या मोहिमेला ७०४४ कोटी रुपये खर्च आला असून यात १० देशातील वैज्ञानिक सामील झाले होते.

Leave a Comment