पेरू देशातील अद्भुत रेनबो पर्वतमाला

peru
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनल्याने आणि त्यामुळेच अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने पेरू या देशातील रेनबो पर्वत अधिक चर्चेत आले आहेत. केवळ पाच वर्षापूर्वी शोधले गेलेले हे पर्वत १७ हजार फुट उंचीवर आहेत आणि पावसाळ्यात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे सात रंग यात स्पष्टपणे दिसतात. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर हे रंग अधिक खुलतात. हा भाग अँडिज पर्वतरांगात मोडतो.

mountain
वर्षातील आठ महिने हे इंद्रधनुषी पर्वत पाहता येतात. असे सांगतात कि हजारो वर्षापूर्वी या पर्वताचा रंग सामान्य पर्वताप्रमाणे होता. मात्र येथील खडक झिजून माती वाहून गेल्यावर वेगवेगळे रंग दिसू लागले. त्यात लाल, पिवळा, जांभळा, हिरवा, नीळा हे रंग विशेष उठून दिसतात. या ठिकाणी सध्या वर्षाला ४ लाख पर्यटक येत आहेत आणि त्यामुळे या पर्वताना धोका निर्माण झाला आहे. येथे पोहोचण्यासाठी तीन तासाचा पायी प्रवास करावा लागतो. १७ हजार फुट उंचीवर असल्याने प्राणवायू कमी असतो त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो तरीही येथे पर्यटकांची गर्दी वाढती आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार पर्वतात दिसणारे रंग त्यातील खनिजांमुळे आहेत. लाल रंग लोखंडामुळे, पिवळा सल्फर मुले, हिरवा अथवा निळा क्लोराईडमुळे येतो. येथे पावसाळा आणि हिमवर्षाव सुरु असताना जाऊ नये अश्या सूचना पर्यटकांना दिल्या जातात कारण त्यावेळी पर्वताचे हे मनोहारी रंग दिसत नाहीत.

Leave a Comment