फेसबुक ५० लाख भारतीयांना देणार डिजीटल मार्केंटिंग शिकण्याची संधी

नवी दिल्ली – फक्त टाईमपासच म्हणून फेसबुक आहे असे वाटत असेल तर थांबा.. आता हेच माध्यम तुम्हाला ऑनलाईन डिजीटल मार्केंटिग शिकविणार आहे. फेसबुकने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत अधिकाधिक पोहोचण्यासाठी डिजीटल कौशल्य शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध १० ऑनलाईन कार्यक्रमातून फेसबुकने १० लाख लोकांना प्रशिक्षित केले आहे. १५० शहरे आणि ४८ हजार गावांतील वापरकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. फेसबुकने त्यासाठी ५० भागीदारांचे सहकार्य घेतले आहे. ही माहिती फेसबुकने आयोजित केलेल्या २ दिवसीय कम्युनिटी बुस्ट प्रोग्रॅमध्ये दिली आहे.

आम्हाला राज्य सरकार व स्थानिक भागीदारांचे सहकार्य असल्याचे फेसबुकच्या पब्लिक पॉलिसीचे संचालक अंखी दास यांनी सांगितले. त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय आणि आंत्रेप्रेन्युरशिपबरोबर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

छोट्या व्यावसायिकांना या प्रशिक्षणातून डिजीटल अस्तित्व आणण्यासाठी सोप्या पद्धती शिकविल्या जात आहेत. त्यामुळे वेबसाईट तयार करणे, होस्टिंग करणे यासाठी लागणारा मोठा खर्च व्यावसायिकांचा वाचू शकणार आहे. तसेच इनस्टाग्रामचा वापर करण्याशिवाय हे प्रशिक्षिण उपयुक्त आहे. हे प्रशिक्षण १४ भारतीय भाषात उपलब्ध आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्र, गुजरात, पंजाबसह २९ राज्यात पोहोचले आहे. प्रशिक्षण घेतललेल्या ८० टक्के सुक्ष्म, मध्यम उद्योगांनी फेसबुकमुळे व्यवसायात वाढ झाल्याचे सांगितले.

Leave a Comment