सॅमसंग पाठोपाठ नोयडात विवोचे अलिशान कार्यालय

vivono
कोरियन कंपनी सॅमसंगने नोइडा येथे भारतातील सर्वात मोठे कार्यालय आणि कारखाना सुरु केल्या नंतर आता चीनी स्मार्टफोन कंपनी नोइडा येथेच प्रचंड मोठे कार्यालय स्थापन करणार असून त्यासाठी ३५०० कोटीची गुंतवणूक पहिल्या टप्प्यात केली जात आहे. यमुना एक्स्प्रेस वे अॅथॉरिटीच्या गौतम बुद्ध नगर मध्ये त्यासाठी १६९ एकर जागा दिली गेली असून या कंपनीचे मुख्यालय चीनच्या डोंगगुआन येथे आहे. कंपनीने यापूर्वी ५० एकर जागेत ग्रेटर नोइडा येथे मोबाईल कारखाना सुरु केला असून तेथे दरवर्षी २४ लाख मोबाईलचे उत्पादन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन प्रकल्पात १ वर्षात २५ हजार रोजगार दिले जाणार आहेत आणि त्यातील ३० टक्के रोजगार स्थानिकांना मिळणार आहेत. कंपनी दुसऱ्या टप्प्यात २०० एकर जमीन घेऊन ३५०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यावेळी १५ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment