देशात गेल्या चार वर्षात खादी उत्पादनांच्या किमतीत तिपटीपेक्षा अधिक वाढ होत असून खादीचा प्रचार आणि प्रसार आणखी गतीने व्हावा यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाने रेल्वे मंत्रालयाकडे विशेष खादी एक्स्प्रेस चालविण्याच्या आग्रह धरला आहे. आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना म्हणाले यंदा देशात म. गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्ताने म. गांधी देशात जेथे जेथे गेले होते त्या ठिकाणांना भेट देणारी विशेष खादी एक्स्प्रेस सुरु करावी असा आमचा आग्रह आहे. या ५ डब्यांच्या गाडीत खादी संबंधी प्रदर्शन आणि उत्पादन विक्रीची सुविधा असावी. तशी विनंती रेल्वे मंत्रालयाला केली गेली आहे.
खादीच्या मागणीत प्रचंड वाढ- विशेष खादी एक्स्प्रेसची मागणी
देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून खादी उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मोदी स्वतः खाडी वापरा असे अपील नेहमीच करत आले आहेत. त्यामुळे सुती बरोबरच रेशमी खादी लोकप्रिय ठरली असून आता फॅशन विश्व खादीचा वापर आवर्जून करत आहे. २०१४-१५ सालात खादी ग्रामोद्योगची उलाढाल ८११ कोटी होती ती आता २०१७-१८ मध्ये २५०९ कोटींवर गेली आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, एर्नाकुलम, गोवा, जोधपूर, अश्या ७ मुख्य विक्री केंद्रांवर मोदी जॅकेट आणि मोदी कुर्ता यांना प्रचंड मागणी आहे आणि दररोज किमान १५०० जोड्या विकल्या जात आहेत असेही विनय कुमार यांनी सांगितले. आता वुलन खादीमध्येही मोदी जॅकेट विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातून हि खादी उत्पादनांना मागणी येत आहे.