पेरू देशामध्ये सापडले साडेपाचशे वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे

peru
पेरू देशामध्ये ‘त्रुजिलो’ प्रांतामध्ये सुरु असलेल्या उत्खननामध्ये तब्बल एकशे चाळीस मानवी अवशेष सापडले आहेत. सुमारे एकशे चाळीस मानवांचे अवशेष येथे सापडले असून, त्यांच्यासोबत लामा नामक जनावरांचे अवशेष देखील येथे सापडले आहेत. हे अवशेष ज्या पद्धतीचे आहेत त्या वरून एखाद्या धार्मिक अनुष्ठानासाठी मानवांचे आणि प्राण्यांचे बळी दिले गेले असावेत असा पुरातत्ववेत्त्यांचा आणि इतिहासकारांचा कयास आहे. हे सर्व अवशेष सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वीचे असावेत असा तज्ञांचा कयास आहे.
peru1
‘नॅशनल जियोग्रॅफिक सोसायटी’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीच्या अनुसार पेरू देशच्या उत्तरी भागामध्ये साडेपाचशे वर्षांपूर्वी एखाद्या धार्मिक अनुष्ठानासाठी नरबळी आणि प्राण्यांचे बळी दिले गेले असावेत. या ठिकाणी उत्खननाचे काम सुरु झाले तेव्हा २०११ साली सर्वप्रथम ४२ मानवांचे अवशेष आणि त्यांच्यासोबत ७० लामा या प्राण्यांचे अवशेष मिळाले. पण जसजसे उत्खाननाचे काम वाढत गेले तसतसे अधिकाधिक अवशेष सापडू लागले. आजवर या ठिकाणी एकूण १४० मानवांचे अवशेष आणि २०० च्या आसपास लामा या जनावरांचे अवशेष सापडले असल्याचे समजते.
peru2
सध्या उत्खनन सुरु असलेल्या या ठिकाणाला ‘हुआनचाकितो लास लामास’ या नावाने संबोधले जाते. आता हे ठिकाण युनेस्को द्वारे ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरुवातीला २०११ साली काही कारणाने खोदकाम सुरु झाले असता, येथे मानवी अवशेष सापडल्यानंतर याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर येथे उत्खननाचे काम सुरु झाले होते. याच उत्खननामध्ये आणखीही मानवी अवशेष आणि प्राण्यांचे अवशेष पुरातत्ववेत्त्यांना सापडले होते. हे अवशेष जमिनीमध्ये खूप खोलवर दबले असल्याने ‘रेडियोकार्बन’ तंत्रज्ञानाचा वापर करून या अवशेषांचा शोध घेतला गेला होता.

Leave a Comment