गुगलचे कर्णबधीरांचे पितामह ‘चार्ल्स् मिशेल द-एपी’ यांना डूडल स्वरुपात अभिवादन

नवी दिल्ली – आज चार्ल्स् मिशेल द-एपी यांच्या ३०६व्या जन्म दिवसानिमित्त गुगलने डूडल प्रसिद्ध केले असून कर्णबधीरांचे पितामह म्हणून चार्ल्स् मिशेल हे ओळखले जातात. गुगलने त्यांचीच आठवण म्हणून डूडलच्या स्वरुपात चार्ल्स् यांना अभिवादन केले आहे.

सांकेतिक वर्णमालेचे चार्ल्स् मिशेल हे जनक असून कर्णबधीर लोकांना त्यांच्या सांकेतिक वर्णमालेमुळे संवाद साधण्यास अत्यंत मदत झाली आहे. आपले संपूर्ण जीवन त्यांनी कर्णबधीर लोकांच्या उद्धारासाठी खर्ची घातले होते. जगात सर्वप्रथम कर्णबधीरांसाठी शाळा काढणारे म्हणून त्यांना ओळखले जाते.

जन्म २४ नोव्हेंबर १७१२मध्ये फ्रांस येथील वर्सेस या शहरात चार्ल्स् मिशेल द-एपी यांचा झाला होता. त्यांचा ज्या कुटुंबात जन्म झाला ते संपन्न घराणे म्हणून ओळखले जात होते. त्यांना एकदा शहरात फिरताना २ कर्णबधीर बहिणी आढळल्या होत्या. त्या हातांचे इशारे करत एकमेकांशी संवाद साधत होत्या. चार्ल्स् मिशेल यांनी त्यानंतर कर्णबधीरांना शिकवण्याचा निश्चय केला. दरम्यान त्यांनी सांकेतिक भाषा शोधून काढली होती. २३ डिसेंबर १७८९मध्ये त्यांचा पॅरिस येथे मृत्यू झाला.

Leave a Comment