पिसाचा जगप्रसिद्ध झुकता मनोरा ४ इंचांनी झाला सरळ

pisa
इटलीतील पिसा येथील झुकता मनोरा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असून त्याचा झुकतेपणा दरवर्षी किमान १० लाख पर्यटकांना त्याच्याकडे आकर्षित करणारा महत्वाचा घटक आहे. इतका झुकूनही हा मनोरा अजून उभा कसा याचे आश्चर्य पर्यटकांना वाटतेच पण अनोखे वास्तुशिल्प म्हणूनही तो पाहण्यासाठी गर्दी होत असते.

१२ व्या शतकात बांधल्या गेलेल्या या जगप्रसिद मनोऱ्याचा पाया गेली काही वर्षे कमजोर झाल्यामुळे हा मनोरा एकीकडे कलला आहे. या मनोऱ्याचे बांधकाम १४ व्या शतकात पूर्ण झाले मात्र त्याचे झुकणे सुरूच राहिल्याने तो कोसळण्याची भीती निर्माण झाली. इटली मधील तज्ञ इंजिनिअर्सच्या सततच्या प्रयत्नातून हा मनोरा झुकण्याचा वेग कमी केला गेला आणि आता तर तो चार इंचाने सरळ झाला आहे. गेल्या १७ वर्षात हि सुधारणा दिसून आली आहे.

या ५७ मिटर उंचीच्या मनोऱ्याची देखभाल गेली १७ वर्षे या इंजिनिअर्सकडे आहे. या मनोऱ्याचा झुकाव प्रथम ५.५ डिग्री होता तो आता ३.९९ डिग्री वर आला आहे. १९२० सालापासून हा मनोरा सरळ करण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि १९९० मध्ये त्यासाठी तज्ञ इंजिनिअर्सचे विशेष पथक नेमले गेले. त्याच्या प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment