जगातील पहिली थ्रीडी प्रिंटेड फंक्शनल इलेक्ट्रिक बाईक तयार झाली असून जर्मन कंपनी बिगरिप आणि नाऊ लॅबने संयुक्त रित्या ती बनविली आहे. या बाईकचे नामकरण नेरा असे केले गेले आहे. या बाईकचे रिम, टायर, फ्रंट सस्पेन्शन, फोर्क, सीत आणि फ्रेम थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने तयार केले गेले आहे.
तयार झाली पहिली थ्रीडी प्रिंटेड इलेक्ट्रिक बाईक
नेराचे व्हील डिझाईन अतिशय युनिक आहे. या बाईकचे टायर हवेशिवाय असून तेही थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने बनविले गेले आहेत. या बाईकचा मधला भाग मोकळा असून बाईकला फ्युच्यूरिस्टीक फ्रंट पॅनल आणि रिअर पॅनल दिले गेले आहे. फोर्कलेस स्टिअरिंग सिस्टीम असून यात वापरले गेलेले अनेक सुटे भाग अत्तापर्यात कुठल्याच बाईकमध्ये वापरले गेलेले नाहीत असा दावा केला जात आहे. या बाईकचा ऑफिशियल व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हि बाईक बाजारात तगडी स्पर्धा निर्माण करेल असा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला आहे.