मायक्रोसॉफ्टने सुरू केले ‘लिंकडिन सॅलरी’ फिचर

linkedin
नवी दिल्ली – आपल्या नोकरीचे कोणत्याही प्रकारचे क्षेत्र असो पण कुठे जास्त पगार मिळतो, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. यासाठी ‘लिंकडिन सॅलरी’ हे फिचर मायक्रोसॉफ्टने सुरू केल्यामुळे कोणत्या पदासाठी किती पगार मिळतो, हे तुम्हाला ऑनलाईन कळू शकणार आहे.

करियर बदलताना कोणत्याही नोकरदाराला किती पगार मिळतो, हे सर्वात अधिक महत्त्वाचे असते. लिंकडिन ही प्रोफेशनल सोशल मीडिया नेटवर्क आहे. योग्य नोकरी शोधणे यावरील ‘सॅलरी’च्या फिचरमुळे अधिक सोपे ठरणार आहे. याबाबत माहिती देताना मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, लिंकडिनचे ५.३ कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. त्यांना नोकरीची संधी निवडताना विविध कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या बोनससह इतर माहिती कळू शकणार आहे. भारत ही स्पर्धात्मक नोकरींची बाजारपेठ आहे. लिंकडिन सॅलरीतून पारदर्शकता येईल आणि नोकरी शोधणारे अधिक सक्षम होतील, असे लिंकडिनचे इंडिया प्रोडक्ट हेड अजय दत्ता यांनी सांगितले.

Leave a Comment