रेल्वेला नेटवर्क सेवा देणार रिलायंस जिओ

railjio
रेल्वेतील अधिकारी, कर्मचारयाना आता रिलायंस जिओ नेटवर्क सेवा १ जानेवारीपासून दिली जाणार असून त्यामुळे रेल्वेच्या नेटवर्क बिलामध्ये ३५ टक्के बचत होणार आहे असे समजते. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी याच्या फोनची बिले रेल्वेतर्फे भरली जातात. या वर्गाला क्लोज युजर ग्रुप कनेक्शन तर्फे हि सेवा पुरविली जाते. आत्तापर्यंत गेले ६ वर्षे हि सेवा भारती एअरटेल तर्फे दिली जात होती. या कंपनीचा करार डिसेम्बर २०१८ ला संपत आहे. १.९५ लाख कर्मचार्यांना या सेवेचा लाभ दिला जात होता.

भारती एअरटेलला या सेवेच्या बिलापोटी रेल्वे दरवर्षी १०० कोटी देत असे. यंदाची निविदा जिओने घेतली असून जिओ इन्फोकॉम ३.७८ लाख कर्मचारयाना हि सेवा देणार आहे. जिओ हायस्पीड इंटरनेट डेटा , अनलिमिटेड व्हॉइस कॉल शिवाय एसएमएस सुविधाही यात दिली जाणार आहे. डेली डेटा संपला तर १० रु.मध्ये २ जीबी डेटा युजर वापरू शकणार आहे. ४ प्लान मध्ये हि सेवा दिली जाणार आहे.

यात वरिष्ठ अधिकारी ६० जीबी, संयुक्त सचिव पातळीवरील अधिकारी ४५ जीबी, ग्रुप सी स्टाफ ३० जीबी डेटा वापरू शकतील व त्यासाठी अनुक्रमे १२५,९९ व ६७ रु. चार्ज आकाराला जाणार आहे. शिवाय ४९ रुपयात एसएमएस प्लान दिला जाणार आहे.

Leave a Comment