महेश्वर येथील प्राचीन गोबर गणेश मंदिर

gobar
भारतात प्रत्येक गावात किमान एक तरी गणेश मंदिर आहे आणि या मंदिरांचे काही ना काही महत्व आहे. मध्यप्रदेशातील मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या महेश्वर येथील गोबर गणेश मंदिर येथील मूर्ती संबंधाने प्रसिद्ध आहे. येथील मूर्ती शेण आणि मातीपासून बनलेली असून ती शेकडो वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. यामुळे हे मंदिर गोबर गणेश म्हणजे शेणापासून बनलेला गणेश याच नावाने प्रसिद्ध आहे.

या मंदिरात भाविकांची वर्षभर गर्दी असते. येथील गणेशाला नारळ अर्पण केला कि भाविकाची मनोकामना पूर्ण होते असा विश्वास आहे. येथील मूर्ती अतिशय सुंदररीतीने सजविलेली असून ती भव्य आहे. त्यामुळे या मूर्तीच्या दर्शनानेच भाविकांना सर्व दु:ख्खाचा विसर पडतो असे सांगतात.

गोमय म्हणजे गाईचे शेण पवित्र मानले जाते. यात लक्ष्मीचा निवास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे गोबरपासून बनविली गेलेल्या या मूर्तीत गणेश आणि लक्ष्मी विराजमान आहेत असे मानले जाते. येथे गणेश त्याच्या दोन पत्नी रिद्धी सिद्धी सह आहे.

या मंदिरात आणखी एक प्रथा आहे. ज्या भाविकांना त्यांची काही विशेष इच्छा पूर्ण व्हावी असे वाटते, ते येथे येऊन उलटे स्वस्तिक काढतात. इच्छा पूर्ण झाली कि पुन्हा येऊन सुलटे स्वस्तिक काढले जाते.

Leave a Comment