जागतिक बँकेच्या प्रमुखांकडून मोदींचे तोंडभरून कौतुक

modi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते जगात अत्यंत कमी आहे, अशा शब्दांत जागतिक बँकेचे प्रमुख जिम याँग किम यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ वृत्तपत्रात खास लेख लिहून याँग यांनी ही तारीफ केली आहे, हे विशेष.

‘पीएम मोदी हॅज टेकन सीरियस बिजनेस रेग्युलेटरी रीफॉर्म्स’ (पंतप्रधानांनी कामकाज नियामक सुधारणा गांभीर्याने घेतल्या आहेत) या शीर्षकाचा लेख याँग यांनी लिहिला आहे. “पंधरा वर्षांपूर्वी जागतिक बँकेने पहिल्यांदा डुइंग बिजनेस (डीबी) इंडेक्स अहवाल प्रकाशित केला होता. त्यात प्रत्येक देशाला मानांकन देण्यात आले होते. हे मानांकन देशात व्यवसाय सुरू करणे आणि ते चालविणे, या संबंधातील नियमांच्या आधारे तयार करण्यात आले होते.

मी मोदी यांना पहिल्यांदा ऑक्टोबर 2014 मध्ये भेटलो होतो त्याच्या काही दिवस आधीच हा अहवाल आला होता. त्यावेळी 189 देशांमध्ये भारत 142व्या स्थानी होता. मोदी यांनी पहिल्या 50 देशांमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न व्यक्त केले होते आणि जागतिक बँकेकडे हे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती व सल्ला मागितला होता. भारताने त्यानंतर नियमांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.

“कामकाजाशी संबंधित सुधारणा गांभीर्याने घेणारे नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते जगात अत्यंत कमी आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment