मधमाशीच्या डंखाने अॅक्यू पंक्चर करविणे ठरू शकते प्राणघातक

bee
आजकाल लहान मोठ्या आजारपणासाठी अनेक तऱ्हेच्या उपचारपद्धती अवलंबिण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. अश्या उपचारपद्धती तज्ञांच्या नजरेखाली अवलंबताना त्यांच्या मार्फत आजार पुष्कळ अंशी बरे होतातही, त्याशिवाय या उपचारपद्धतींचे फारसे अपायकारक दुष्परिणामही रुग्णांना सहन करावे लागत नाहीत. मात्रा हे उपचार करविताना देखील काळजी घेणे अतिशय अगत्याचे ठरते, अन्यथा हे उपचार प्राणघातक ठरू शकतात. अशीच घटना काही काळापूर्वी स्पेन येथे घडली.
bee1
स्पेनची निवासी असलेली महिला तिच्या पायदुखी करिता अॅक्यूपंक्चर उपचारपद्धती वापरून उपचार घेत होती. अॅक्यू पंक्चर ही उपचारपद्धती आजच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये प्रचलित असून शारीरिक व्याधींवर प्रभावी उपचार म्हणून अवलंबली जात असते. पण या महिलेने मात्र आगळीच अॅक्यू पंक्चर उपचार पद्धती अवलंबली होती. मधमाश्यांच्या करावी डंख करवून घेऊन ही महिला अॅक्यू पंक्चर करवून घेत असता, विशिष्ट प्रकारच्या मधमाशीच्या डंखामुळे या महिलेला अचानक श्वासोत्छ्वासास त्रास होऊ लागला.
bee2
त्यानंतर या महिलेला इस्पितळामध्ये भरती करण्यात आले, तिथे ती काही दिवस उपचार घेत होती. पण काही दिवस उपचार घेऊनही महिलेचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. सुरुवातीला या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांना समजू शकले नाही, त्यानंतर महिला गेली दोन वर्षे सातत्याने मधमाश्यांच्या डंखा करवी केले जाणारे अॅक्यू पंक्चर करवीत असल्याचे निष्पन्न झाले. मधमाशीच्या डंखामुळे विषबाधा झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न तपासामध्ये झाले. अश्या प्रकारे मधमाशीच्या डंख करवून घेऊन अॅक्यू पंक्चर करवून घेण्याची पद्धत चीन आणि कोरिया देशामध्ये रूढ आहे.

Leave a Comment