रोबोट्स करणार गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार

robo
अहमदाबाद – शहरातील ‘गुजरात सायन्स सिटी’ व्हायब्रंट समिटसाठी (परिषद) सज्ज झाली असून ५० रोबोट जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी सज्ज झाले असून, हे रोबोट्स या परिषदेदरम्यान फक्त पाहुणचाराचे काम करणार नसून, तर पाहुण्यांचे स्वागत देखील करणार आहेत.

रंगीत तालीम म्हणून या रोबोट वेटर्सकडून प्रात्याक्षिक देखील परिषदेकडून करुन घेण्यात आले. ज्या अंतर्गत या वेटर्सनी चहा आणि नाश्ता वाढण्याचे काम केले. या प्रात्यक्षिकात जवळपास ५० प्रकारचे रोबोट्स होते. आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रीम बुध्दीमता) तंत्रज्ञानाचा या रोबोट्सच्या नियंत्रणासाठी वापर करण्यात आला असून, १२५ कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी आला आहे.गुजरातमध्ये अधिकाधिक परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी २००३ पासून या व्हायब्रंट समिटला (परिषद) सुरुवात करण्यात आली. जानेवारी २०१७ मध्ये ८वी व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद पार पडली. या परिषेदेत १०० विविध देशातील पंचवीस हजारांपेक्षा जास्त जणांनी भाग घेतला होता. ज्यात चार देशांचे प्रमुख, आघाडीचे साहित्यिक, जागतिक दर्जाचे उद्योजकांची उपस्थिती होती.

‘शेपिंग न्यू इंडिया’ ही संकल्पना आगामी व्हांयब्रंट गुजरात परिषदेसाठी राबविण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरला गुजरात सरकारतर्फे या संदर्भात रोड शो देखील करण्यात येणार आहे. एकूण सहा रोड शो गुजरात सरकारकडून आयोजित करण्यात येणार आहेत. दिल्ली, बई, पुणे, हैदराबाद, बंगळुरु आणि कोलकाता या शहरांचा ज्यात सामावेश आहे. आपल्या देशाला वेटर्सच्या भूमिकेत रोबोट्स ही संकल्पना तशी नवी नाही. चेन्नईमध्ये पाच युवकांनी एकत्र येत एका रेस्टॉरंट सुरु केले आहे ज्यात वेटर्सची भूमिका रोबोट्सनी निभावली आहे. बांग्लादेशची राजधानी ढाक्यात देखील अशा प्रकारचे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे.

Leave a Comment