पाच वर्षाच्या चिमुकल्याने पुश-अप मारले ४,१०५ अन गिफ्ट मिळाली मर्सिडीज

push-up
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे असून व्यायामापासून अनेक तरूण दूर पळतात. व्यायाम त्यांना नको वाटतो. पण तुम्हाला पाच वर्षाच्या एका चिमुकल्याचा कारनामा पाहून धक्का बसेल. पाच वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल ४,१०५ पुश-अप मारले असून त्याने हे पुश-अप दोन तास आणि २५ मिनीटामध्ये मारले आहेत.

रशियन लष्करातील लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने पाच वर्षाच्या मुलाच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे खूश होऊन त्याला चक्क मर्सिडीज गिफ्ट केली आहे. तब्बल २६ लाख रूपये या मर्सिडीजची किंमत आहे. चार हजार पुश-अप दोन तासात काढणाऱ्या चिमुकल्याचे नाव राखीम कुरायव असे आहे. राखीम कुरायव याला लहानपणापासूनच व्यायामाचा छंद आहे.

लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने मर्सिडीज गिफ्ट करताना चिमुकल्याला खास संदेशही दिला आहे. ते यामध्ये म्हणतात, ही कार तू आपल्या वडिलांना चालवायला दे. यामध्ये तू आरामत बस. जी कामगिरी तू केली ती कौतुकास्पद आहे. या महागड्या गाडीचा तू हकदार आहे. आता आपण फिटनेस सेंटरमध्ये भेटूया आणि सोबत व्यायाम करूया. लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने मर्सिडीज गिफ्ट केल्यानंतर राखीम कुरायव म्हणाला की, माझे वडिल ही गाडी चालवतील. मला जिममध्ये सोडण्यासाठी आता वडिलांना टॅक्सी घ्यावी लागणार नाही.

Leave a Comment