हाताच्या तळव्यावर शाईने काढलेले काळे वर्तुळ दिसल्यास, हे आहे ‘ब्लॅक डॉट कॅम्पेन’

dot
महिलांच्या प्रती घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी होत असलेल्या अत्याचारांच्या प्रती समाजामध्ये आता अनेक मोहिमांना तोंड फुटलेले आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना मदतीचा हात देण्यास आता समाज द्खील पुढे सरसावत आहे. मात्र यातील अनेक महिला अश्याही आहेत, ज्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल कोणाशी बोलण्याचे धाडस होत नाही. घरच्यांचा धाक, त्यांच्या धमाक्यांपायी मनामध्ये असलेली भीती, कोणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधण्याची मिळत नसलेली संधी अशा विविध कारणांमुळे आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल इच्छा असूनही या महिला मदत मागू शकत नाहीत. अमेरिकेमध्ये ‘डोमेस्टिक व्हायोलंस’, म्हणजेच घरच्यांकडून होत असलेल्या, किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून होत असलेल्या अत्याचारांनी पीडित महिलांच्या मदतीसाठी ‘ब्लॅक डॉट कॅम्पेन’ २०१५ साली सुरु झाले.
dot1
पीडित महिलेने आपल्या हाताच्या तळव्यावर काळ्या रंगाच्या शाईने एक लहानसे वर्तुळ काढल्यास, ते पाहताच पोलिसांना त्वरित सूचना देऊन संबंधित महिलेच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली जावी असे आवाहन या कॅम्पेनद्वारे नागरिकांना करण्यात आले. अनेकदा इतर लोक समोर असूनही उघडपणे मदत मागणे पीडित महिलेला अश्यक्य असल्याने आपल्या हाताच्या तळव्यावर काळे वर्तुळ काढून आपल्या जीवाला असलेल्या धोक्याची आणि पर्यायाने पोलिसांना सूचित करण्याची विनंती पीडित महिला करू शकते. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून असे वर्तुळ महिलेच्या हातावर दृष्टीस पडताच त्वरित पोलिसांना या बद्दल सूचित करण्याचे आवाहान केले गेले.
dot2
या कॅम्पेनबद्दलची माहिती सोशल मिडीयाच्या आणि इतर प्रसारमाध्यमांच्या वतीने देखील नागरिकांच्या पर्यंत पोहोचविण्यात आली असून, आता हे कॅम्पेन अमेरिकेसोबतच इतर देशांमध्ये ही प्रसिद्ध होत आहे. हाताच्या तळव्यावरील काळे वर्तुळ दृष्टीस पडताच संबंधित महिला संकटामध्ये असून तिला मदतीची आवश्यकता असल्याचे ओळखून, तिला मदत मिळवून देण्यामध्ये नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या कॅम्पेन द्वारे करण्यात आले आहे. या कॅम्पेनची सुरुवात अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीने २०१५ साली केली होती.

Leave a Comment