सॅन फ्रान्सिस्को – मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाईल हरवला तर तो सापडण्याची शक्यता कमीच असते. गुगल अॅपच्या माध्यमातून अशावेळी हरवलेला मोबाईल मॉल अथवा विमानतळावर नेमका कुठे आहे, हे तुम्हाला अंतर्गत नकाशावर दिसणार आहे.
गुगल ‘असा’ शोधून देणार हरवलेला स्मार्टफोन
फाईंड माय डिव्हाईस अॅपमध्ये गुगलने अंतर्गत नकाशाची सोय करुन दिली असल्यामुळे चुकून स्मार्टफोन कुठे हरविला तरी त्याचा शोध घेण शक्य होणार आहे. गुगलने कोणत्या इमारतींसाठी अंतर्गत नकाशे उपलब्ध होणार आहेत, याची माहिती मात्र अद्याप जाहीर केलेली नाही.
आपल्याला हरवलेला अँड्राईड स्मार्टफोन शेवटच्या क्षणी कुठे होता, हे या अॅपमुळे समजू शकते. तसेच स्मार्टफोन मिळेतपर्यंत लॉक करण्याचीही सुविधा आहे. अंतर्गत नकाशामुळे (इनडोअर मॅप्स) मोबाईल हा विमानतळ, मॉल अथवा मोठ्या इमारतीत नेमका कुठे आहे, हे कळणार आहे. यामध्ये गुगल मॅपच्या मदतीने स्मार्टफोनची जागा शोधून काढता येते. तसेच मोबाईल सायलेंट मोडवर असला तरी त्याचा आवाज मोठा करता येणे शक्य होते. या अॅपची गेल्यावर्षी ‘मे’मध्ये गुगलने सुरुवात केली होती.