नव्या नियमावलीमुळे मार्च पर्यंत निम्मी एटीएम होणार बंद?

atmclose
देशातील सध्याच्या एटीएम मधील हार्डवेअर आणि सॉफटवेअर अपग्रेड करण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमुळे मार्च २०१९ पर्यटन देशातील निम्मी एटीएम बंद होतील अशी भीती कॅट मी संस्थेच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. देशात सध्या सुमारे २ लाख ३८ हजार एटीएम आहेत. त्यालील १ लाख ऑफसाईट आणि १५ हजारहून अधिक व्हाईट लेबल एटीएमसह १ लाख १३ हजार एटीएम बंद करावी लागतील असे या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँकेने एटीएम अफरातफरी आणि हॅकिंगवर नियंत्रण आणता यावे यासाठी देशातील सर्व बँकांना कॅश मॅनेजमेंट आणि स्टँडर्ड कॅश लोडिंग संदर्भात नवे नियम लागू केले असून त्यासाठी सध्याची एटीएम अपग्रेड करावी लागणार आहेत. हि पद्धत एटीएम संघटनांना अडचणीची असून यामुळे उद्योगात मोठी बेकारी येईल आणि पूर्ण अर्थव्यवस्था तसेच वित्तीय सेवांसाठी हानिकारक ठरेल असा दावा केला जात आहे. नियम पाळण्यासाठी एटीएम मध्ये जे बदल करावे लागणर आहेत त्यासाठी ३५०० कोटी रु.खर्च येणार आहे आणि एटीएम कंपन्या, ब्राऊन लेबल आणि व्हाईट लेबल एटीएम उत्पादक अगोदरच नुकसानीला सामोरे जात असल्याने त्यांना हा नवा खर्च परवडणारा नाही परिणामी एटीएम बंद होतील असे सांगितले जात आहे.