पॅनकार्डच्या नियमात आयकर विभागाने केला ‘हा’ बदल

pan-card
नवी दिल्ली – एकेरी पालकत्व असलेल्या महिलांसाठी आयकर विभागाने दिलासादायक निर्णय घेतला असून एकेरी पालकत्व असलेल्या महिलांच्या मुलांना यापुढे पॅनकार्डवर वडिलांचे नाव बंधनकारक राहणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबत निर्देश काढले आहेत.

पॅनकार्डसाठी अर्ज भरताना आयकर विभागाकडून नवा पर्याय दिला जाणार आहे. एकेरी पालकत्व असलेल्या महिलांच्या मुलांना यातून आई ही पालक असल्याचा पर्याय निवडता येणार आहे. अर्जदाराची इच्छा असल्यास वडिलांच्या जागी आईचे नाव पॅनकार्डसाठी देता येणार आहे. ५ डिसेंबरपासून हा नवीन नियम अमलात येणार आहे.

एका आर्थिक वर्षात २.५ लाख रुपयाहून व्यवहार करणाऱ्या नागरिकांना पॅनकार्ड बंधनकारक असल्याचेही आयकर विभागाच्या निर्देशात म्हटले आहे. यामुळे आयकर विभागाला करचुकवेगिरीला आळा घालणे आणि करदात्यांच्या संख्येत वाढवण्यासाठी मदत होणार आहे.

Leave a Comment