आता ‘इनकमिंग कॉल’साठीही मोजावे लागणार पैसे?

incoming
नवी दिल्ली: लवकरच मोबाईल धारकांना दूरसंचार कंपन्यांकडून मोठा धक्का देण्याची तयारी सुरू असून दूरसंचार क्षेत्रातील जिओच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. परिणामी ‘इनकमिंग कॉल’साठी आता कंपन्यांनी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केली आहे. इनकमिंग कॉलची मोफत सुविधा कंपन्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून पुरविली जाते. पण मोबाईल धारकांना आता इनकमिंग कॉलसाठी महिन्याकाठी (२८दिवस) काही शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे.

कंपन्यांकडून सुरुवातीला मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंगसाठी देखील शुल्क आकारले जात होते. पण डेटा आणि दरयुद्ध जिओने छेडल्यानंतर इतर कंपन्यांनी देखील कॉल दर कमी केले. परिणामी कंपन्यांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. मोबाईल धारकांचा वापर स्वस्त इंटरनेट प्लॅनमुळे वाढल्यामुळे इंटरनेट पॅकमुळेच आऊटगोइंग कॉलही स्वस्त किंवा काही कंपन्यांनी ठराविक कॉल मोफत सुविधा देऊ केली. पण आता ‘इनकमिंग कॉल’साठी पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment