रिलायन्सच्या जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. रिलायन्स जिओ आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये ४जी सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून कंपनीने जपानच्या केडीडीआयशी हातमिळवणी केली आहे.
जिओची आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु
यामुळे जपानहून भारतात येणाऱ्या आणि भारतातून जपानला जाणाऱ्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये नंबर न बदलता ४जी सेवेचा लाभ घेता येणार आहे. भारतात इंटरनेट वापरासोबत व्हॉईस कॉलिंगही जपानी नागरिक करू शकणार आहे. जिओ आणि केडीडीआयच्या वापरकर्त्यांनाच ही सेवा मिळणार आहे.
सप्टेंबर २०१६मध्ये रिलायन्स जिओने ४ जी सेवा सुरु केली होती. यानंतरच्या २० महिन्यांत जिओ देशातील सर्वात जलद इंटरनेट सुविधा देणारे नेटवर्क बनले आहे. ट्रायच्या आकड्यांनुसार सप्टेंबर २०१८मध्ये जिओचा सरासरी डाऊनलोडींग स्पीड 20.6 एमबीपीएस होता.