आयआयटी हैदराबादचे संशोधन; स्मार्टफोनद्वारे ओळखता येणार दुधातील भेसळ

haydrabad
नवी दिल्ली – स्मार्टफोनद्वारे तुम्हाला विकत घेतलेल्या दुधात किती भेसळ आहे, हे समजू शकले तर, पण आता ही अशक्य वाटणारी कल्पना अस्तित्वात येण्यासाठी आयआयटी हैदराबादमध्ये संशोधन होत आहे. आयआयटीमधील संशोधकांनी पहिल्या टप्प्यावर दुधातील आम्लतेचे प्रमाण कळू शकणारी डिटेक्टर तयार केले आहेत.

दुध भेसळीचे देशभरात प्रमाण वाढलेले असताना सरकारचे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. आयआयटीमधील संशोधकांनी यावर उपाय शोधण्यासाठी मोबाईलशी जोडणारा अल्गोरिदम तयार केला आहे. यामध्ये मोबाईल कॅमेरातून दुधातील बदल समजू शकतात.

हे संशोधन प्रोफेसर शिव गोविंद सिंह यांच्या मागर्दशनाखाली होत असून २००८ च्या फुड अॅनालिटिकल मेथड्स जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. क्रोमॅटोग्रॅफी, स्पेक्ट्रोस्कोपी अशा महागड्या तंत्रज्ञानाची गरज दुधातील भेसळ शोधून काढण्यासाठी असते. मोठी यंत्रणा त्यासाठी उभी करावी लागते. पण हे सर्वसामान्य ग्राहकाला शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्याला वापरता येतील अशी साधने तयार करण्याची गरज प्रोफेसर शिव गोविंद यांनी व्यक्त केली.

६८.७ टक्के भेसळ दुध व दुग्धजन्य पदार्थात होत असल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाने म्हटले होते. दुधात डिटर्जंट, ग्लुकोज, युरिया, कॉस्टिक सोडा, व्हाईट पेंटची भेसळ करण्यात येते. एवढेच नव्हेतर फॉर्मॅलिन, हायड्रोजन पेरॉक्साईड, बोरिक अॅसिड आणि अँटीबायोटिक्सची भेसळ करण्यात येते. त्याचा आरोग्यावर हानीकार परिणाम होतो.

Leave a Comment