सॅमसंग गॅलेक्सी ए ९ लाँच

galaxya9
सॅमसंगने त्यांचा गॅलेक्सी ए ९ हा नवा स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच केला असून रिअर बाजूला चार कॅमेरे असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन आहे. या फोनच्या रिअरवर ८,२४, ५ व १० एमपीचे चार कॅमेरे दिले गेले असून सेल्फीसाठी फ्रंटला २४ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. या फोनचे प्रीबुकिंग सुरु झाले असून तो २८ नोव्हेंबर पासून मिळू शकणार आहे.

या फोनच्या ६ जीबी व्हेरीयंटची किंमत ३६९९० रुपये तर ८ जीबी व्हेरीयंटची किंमत ३९९९० रुपये आहे. या फोनसाठी १२८ जीबी स्टोरेज दिले गेले असून मायक्रोकार्डच्या सहाय्याने ते ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. फोनचा स्क्रीन ६.३ इंची फुल एचडीचा आहे. अँड्राईड ८.० ओएस, क्विक चार्ज सपोर्ट करणारी ३८०० एएमएचची बॅटरी, रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस रेकग्निशन अशी याची अन्य फिचर आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष आसीम वारसी म्हणाले या वर्षातील स्मार्टफोनचे हे शेवटचे मॉडेल असून एचडीएफसीच्या क्रेडीट डेबिट कार्डवरून फोनची खरेदी केल्यास ३ हजार रु. कॅशबॅक दिला जाणार आहे.

Leave a Comment